एलुरू
एलुरू : आंध्र प्रदेश राज्याच्या पश्चिम गोदावरी जिल्ह्याचे व पूर्वीच्या मद्रास इलाख्यातील कृष्णा जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण. लोकसंख्या १,२७,०४७ (१९७१). कृष्णा गोदावरी कालव्यांच्या संगमावर हे वसले आहे. शहराच्या उत्तरेस सु. १३ किमी. वर पेड्डावेंगी येथे प्राचीन वेंगी या चालुक्यांच्या राजधानीचे अवशेष आहेत.